मोबाईल – वरदान की शाप?
मोबाईल – वरदान की शाप?
आजच्या काळात मोबाईल हे जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनले आहे. मोबाईलच्या मदतीने आपण कुठेही, केव्हाही कोणाशीही बोलू शकतो. त्यावरून मेसेज, फोटो, व्हिडीओ पाठवता येतात. इंटरनेटमुळे शिक्षण, माहिती आणि मनोरंजन सहज मिळते. कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण मोबाईलमुळेच शक्य झाले. त्यामुळे मोबाईल हे एक वरदान वाटते. पण मोबाईलचा अती वापर हानिकारक ठरतो. सतत मोबाईल वापरल्यामुळे डोळ्यांवर ताण येतो. मुलांचा अभ्यास विसरला जातो. अनेक मुले गेम्स आणि सोशल मीडियामध्ये गुंतून राहतात. त्यामुळे वेळ वाया जातो. शरीराला व्यायाम मिळत नाही. एकमेकांशी संवाद कमी होतो. अशा प्रकारे मोबाईल शापासारखाही वाटतो. मोबाईलचा योग्य आणि मर्यादित वापर केल्यास तो खरोखरच वरदान ठरतो. पण अति वापर टाळल्यासच तो आपले मित्र राहील.
आपल्यावर आहे – मोबाईलचा वापर वरदान ठरणार की शाप!

Comments
Post a Comment