भूक...❤️🩹🐒
भूक आणि त्यासाठीचा शोध
एक दिवस सकाळी, माझ्या घराच्या गॅलरीत एक छोटा माकड आणि त्याचा परिवार आला होता. माकडाच्या डोळ्यांत काहीतरी शोधण्याची उत्सुकता आणि काळजी स्पष्ट दिसत होती. त्याने भिंतीवरून आत डोकावलं आणि अन्नाच्या वासाने त्याचे डोळे चमकले. त्याच छोट बाळही मागे उभ होत, आईच्या पोटाशी चिकटलेला, उपाशी आणि घाबरलेला.
माकडांनी काहीही उपद्रव केला नाही, पण त्यांचा एकच हेतू होता, काही अन्न मिळवणं. थोड्याच वेळात ते पुन्हा निघून गेले, पण त्यांच्या डोळ्यांतील ती भूक आणि निरागसता मनाला चटका लावून गेली.
निष्कर्ष
भूक ही मानवाची असो वा प्राण्यांची, ती सारखीच वेदनादायक असते. त्यामुळे आपण अन्नाची नासाडी करू नये. जेवढं आवश्यक आहे तेवढंच घ्यावं आणि उरलेलं अन्न गरजूंपर्यंत पोहोचवावं. कारण, अन्न फक्त शरीराचं नाही, तर करुणेचंही पोषण करतं. 🍂🐒
📸Follow Instagram Account 📷
🔴 YouTube Channel 🎥 | 🎬 Subscribe Now ▶️
Follow Telegram Channel 🔷↗️
Comments
Post a Comment