Std 7th: स्वप्न बघताच आली पाहिजे !
स्वप्न बघताच आली पाहिजे !
स्वप्न बघणं म्हणजे आपल्या मनातल्या इच्छा ,आकांक्षा यांना प्रोत्साहन देणे ! प्रत्येक माणसाच्या मनात काही ना काही स्वप्न असतात. स्वप्न हीच आयुष्याला दिशा देतात. स्वप्नं पाहणं म्हणजे आपल्या उज्वल भविष्याची कल्पना करणं. मी एक चांगला डॉक्टर व्हावं, हे माझं स्वप्न आहे ! स्वप्नं मोठी असली पाहिजेत, पण त्यासाठी मेहनतही तितकीच मोठी असावी लागते. आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करणं, हीसुद्धा एक मोठी जबाबदारी आहे. शाळेत शिकताना अनेकदा शिक्षक आम्हाला मोठं व्हा, असं सांगतात. तेव्हा आपल्या मनात नवनवीन स्वप्नं आकार घेतात. कधी कोणी वैज्ञानिक व्हायचं ठरवतं, तर कोणी क्रिकेटपटू ! स्वप्नं केवळ डोळ्यांत पाहायची नसतात, ती सत्यात उतरवायची असतात. छोट्या छोट्या सवयींमधून मोठं स्वप्न साकार होतं. थोडा अभ्यास, थोडी शिस्त आणि खूप मेहनत हे स्वप्न साकारते.आदरणीय डॉ.अब्दुल कलाम सरांनीही स्वप्न पाहा, असंच म्हटलं होतं. स्वप्न बघणं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं. कधी कधी अपयश येतं, पण स्वप्नांची साथ सोडायची नसते ! स्वप्नं बघितली, तरच आपण काही तरी मोठं करू शकतो. मनात विश्वास असेल, तर आकाशही जवळ वाटतं.
"स्वप्न बघा आणि ती साकार करा !" हेच माझं ब्रीदवाक्य आहे.
म्हणूनच, स्वप्न बघताच आली पाहिजे !
Comments
Post a Comment